पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

आष्टी (शहीद) – पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आष्टी तालुक्यातील बांबर्डा येथे जांब नदी परिसरात घडली.आष्टी तालुक्यातील बांबर्डा येथील दर्शन दिलीप मडावी (वय १९) हा १२ नोव्हेंबर रोजी जांब नदीवर पोहायला जातो म्हणून घरून गेला. रात्र होऊनही तो घरी परत आला नाही. १३ नोव्हेंबर रोजी जांब नदीच्या पाण्यात दर्शनचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

आष्टी तालुक्यातील बांबर्डा येथील शेतकरी दिलीप मडावी यांना दोन मुले आहे. लहान मुलगा शेतीची कामे करत होता. १२ नोव्हेंबर रोजी लहान मुलगा दर्शनने जांब नदीवर पोहायला जातो असे सांगून घरून गेला. रात्री घरी परत आला नाही. १३ रोजी जांब नदीच्या शिवारात एक महिला शेळ्या चराईसाठी गेली असताना नदीच्या काठावर मोबाईल, कपडे, इतर साहित्य दिसून आले. या घटनेची प्रथम पोलीस पाटील मोहित बगळेकर यांना देण्यात आली. पोलीस पाटलांनी ही माहिती आष्टी पोलिसांना देऊन दर्शनच्या आई वडिलांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *