सेलुच्या विकास चौकात स्वच्छतागृह उभारणीची मागणी, साहसिक जनशक्ती संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

सेलु :- शहरातील विकास चौक परिसरात नागरीकांना वाढती गर्दी लक्षात घेता त्याठिकाणी तातडीने सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोठंबकर यांनी नगराध्यक्षांना काल मंगळवारी दिलेल्या निवेदनातून केली. या मागणीसंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.सेलु शहरातील विकास चौक हा एक महत्वाचा व्यापारी आणि दळणवळणाचा केंद्रबिंदु असून, रोज शेकडो नागरिक, व्यापारी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांची या भागात वर्दळ असते.
मात्र, या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना आणि दिव्यांगांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कोठंबकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मंगळवारी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, ‘शहराच्या इतर भागांप्रमाणेच विकास चौकातही मुलभूत सुविधांची आवश्यकता आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे हे त्यात सर्वात महत्वाचे
असून, त्याच्या अभावामुळे आरोग्यासंबंधी समस्यांचा धोका निर्माण होत आहे.’

यावेळी नगराध्यक्षांनी निवेदन स्विकारत संघटनेच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषद नेहमीच तत्पर आहे. संबंधित विभागासोबत चर्चा करुन लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.’

याप्रसंगी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोठंबकर, पत्रकार अनिल वांदिले, सतिश वांदिले, कमलाकर लटारे, श्याम गोल्लर, इश्तफाक शेख, जमील शेख, रशीद शेख, अखिलेश काळबांडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *