हि आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले तसेच हिंगणघाट येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले रात्री १ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीवर जवळपोस रात्री एक वाजेपर्यंत नियंत्रण मिळवण्यात आले परंतु आगीने रुदूरूप धारण केलेल्या गोठ्यासह सर्व साहित्य खाक झाले. हि आग शॉर्टसर्कीट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रभाकर वामनराव पाटेकर यांचा सुतार व्यवसाय होता व ते आपल्या व्यवसायाय या गोठ्यामध्येच करीत होते. यामुळे यावेळी शेतीला लागणारे लाकडी साहित्याच्या मोठ्या प्रमाणात साठवून करून होती. या आगीत त्यांचे जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेतन टेभुर्णे, महसूल विभागाचे व महावितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी प्रभाकर वामनराव पाटेकर यांनी केली आहे.
गावाशेजारील गोठ्याला भिषण आग:आगीत ६ जनावरांचा होरपळून मृत्यु
समुद्रपूर;तालुक्यातील हिरडी गावाशेजारी असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागली या आगीत आगीत ६ जनावरांचा होरपळून मृत्यु झाला यावेळो गोठ्यासह लाकडी साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हिरडी येथील रहिवासी प्रभाकर वामनराव पाटेकर यांच्या गावाशेजारी असलेल्या गोठ्याला गोठ्याला अचानक भिषण आग लागली. यावेळो पाहाता पाहाता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गोठ्याला आपल्या कवजेत घेतले. गोठ्यात बांधून असलेलेली एक गाय वासरू आणि चार बकऱ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यु झाला. तर या आगीत गोठ्यात साठवून असलेले लाकडी साहित्य व कडवा कुटार जाळून खाक झाले.