बुटीबोरी-तुळजापूर रोडवरील दत्तनूर चौकातील सिमेंट रोडचे काम पूर्णत्वास

वर्धा – नागपूर-तुळजापूर सिमेंट रोडचे काम पूर्ण होऊन बर्धाचे वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर वर्धा शहरातील आरती टँकीज पेट्रोल पंपापासून ते दत्तपूर चौकापर्यंत सिमेंट रोडचे काम सुद्धा पूर्ण झाले. परंतु बुटीबोरी-तुळजापूर रोड पासून वर्धा शहरात प्रवेश करतांना दत्तपूर चौकापर्यंतचा सिमेंट रोड गेल्या कित्येक वर्षांपासून तसाच पडून होता. या रोडवर पावसाळ्यात एक फूटपर्यंतचे खड्डे पडलेले होते. वाहनचालकांना वाहन चालविताना या दीडशे ते दोनशे मीटर रोडवरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. वर्धा शहरातून नागपूर पर्यंतचा पूर्ण सिमेंट रोड परंतु दत्तपूर चौकातील हा केवळ १०० ते १५० मीटरचा रोड तसाच पडून असल्याने व कुणीही त्याकडे लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा आश्चर्य व्यक्त करीत होते.

या रोडवरून वाहन चालक वाहन चालविताना मेटाकुटीस येत असे. सदर बाब काही नागरिकांनी खासदार अमर काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही खासदार श्री. अमर काळे यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष रोडची पाहणी केली. त्यावेळी त्यांना या रस्त्यावरील खड्डे पाहून आश्चर्य व्यक्त केले. इतकेंच नव्हेतर नागपूरवरून येतांना वर्धा शहरात प्रवेश करतेवेळी उद्यान पुलाच्या लगतचा रोड हा अतिशय अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश करतांना मोठी कसरत करावी लागत असे. याठिकाणी अपघाताची सुध्दा बरेचदा शक्यता निर्माण होत असे. खासदार अमर काळे यांनी या ठिकाणी जाऊन त्याठिकाणी पाहणी केली. तेथूनच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचेशी चर्चा करून हा प्रवेशी मार्गांचे तात्काळ रुंदीकरण करावे तसेच बुटीबोरी-तुळजापूर रोडवरून दत्तपूर चौकाला जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याचे तात्काळ सिमेंटीकरणाचा प्रस्ताव तयार करून काम सुद्धा तात्काळ करण्यात यावे असे निर्देश दिले.

प्रकल्प संचालक श्री. चिंचकार यांनी खासदार महोदयांच्या फोनची तात्काळ दखल घेऊन लगेच प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी व निविदा प्रक्रीया करून या रस्त्याच्या कामास सुरुवात केली व आजमितीस हे दोन्ही कामे पूर्ण होऊन या दोन्ही ठिकाणाहून वाहतूक सुरळीत सुरु झाली. वर्धा शहरातून नागपूरकडे जातांना सलग सिमेंट रोड झाल्याने तसेच नागपूर रोड पासून वर्धेत प्रवेश करतांना उद्यान पुला लगतच्या मार्गांचे सिमेंटीकरण व रुंदीकरण झाल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व खासदार अमर काळे यांनी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन हे दोन्ही रस्ते पूर्ण करून घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *