धक्कादायक: वर्ध्याच्या १७ वर्षीय तरुणीची रिधोरा धरणात उडी घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,सेलू : वर्धा येथील रामनगर भागातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने सेलू तालुक्यातील रिधोरा धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काजल गजानन रोकडे असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजल मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र, ती कोठेही मिळून आली नाही. शोध घेत असताना कुटुंबीयांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट तपासले असता, तिने रिधोरा डॅम परिसरात काढलेले काही फोटो शेअर केल्याचे आढळले. या माहितीच्या आधारे नातेवाईकांनी तातडीने धरणाकडे धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *