आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नाने २१ गावांतील शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार

प्रतिनिधी दै. प्रतापगडचे वारे कारंजा : कारंजा तालुक्यातील सारवाडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत सावळी (बु.) येथील महावितरणच्या ३३ के. व्ही. सबस्टेशन मधून राजनी व सावळी फिडरला बीज पुरवठा होतो त्या परिसरातील शेतांमध्ये सध्या सर्वत्र ओलीताचे काम सुरू असल्यामुळे व दोन्ही फिडरवर वाढलेल्या मागणीमुळे या सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होत नव्हते हा परिसर जंगलाला लागून असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे सातत्याने दिवसा वीज पुरवठा करण्यासंदर्भात शेतकऱ्यांकडून मागणी होत होती.

याबाबत शेतकन्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ५ क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी महावितरणचे महाव्यवस्थापक श्री करून लोकेश चंद्रा यांना केली होती. त्यानुसार अवघ्या दोन दिवसात तातडीने नागपूर येथून ५ क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर सावळी (बु.) सब-स्टेशन साठी उपलब्ध देण्यात आले. हे ट्रान्सफॉर्मर स्थापित झाल्यावर या सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या २१ गावांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे या गंभीर समस्येची दखल घेत आर्वी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार सुमित वानखडे यांनी शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावली शेतकऱ्यांनी आमदार सुमित वानखडे यांचे आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *