तरुणांना, युवा मुला-मुलींना तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी तंबाखू मुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. तंबाखू आणि सिगारेट पदार्थाच्या सेवनापासून होणा-या आजाराविषयी माहिती समाजाला देऊन त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना तंबाखू आणि सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी युवकांमध्ये तंबाखुच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊन जागरुकता करण्यासाठी व प्रतिबंधात्मक आणि जनजागृती करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
अभियानात सर्वांनी सहभागी होऊन याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. एक निरोगी आणि तंबाखू मुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून सर्वांनी पुढे येऊन आपल्या भावी पिढीच्या सुरक्षेसाठी तंबाखुक्त जीवन हा संकल्प करुया, या अभियानातून जिल्ह्यातील सर्व गावे तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शासकीय व निमशासकीय किंवा सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ खाणे कायद्याने गुन्हा आहे. याकरीता सामान्य रुग्णालय परीसरात तंबाखु जन्य नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असल्याचे डॉ. सुमंत वाघ यांनी सांगितले.