सेलू तालुक्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात: नागरिकांना ‘स्वयं-गणनेची’ सुवर्णसंधी

सेलू : भारतीय जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यंदाची जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे. देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सेलू तालुक्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत हा पहिला टप्पा राबविला जाणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने प्रेसनोटद्वारे दिली आहे.
स्वयं-गणना कालावधी ही १ मे ते १५ मे २०२६ राहणार आहे.

यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करून नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *