नातच निघाली घरांतील दागिने चोरी करणारी

८२ ग्रॅम सोने विकून नातीने कार मोबाईल व इतर चैनीच्या वस्तू घेतल्या बीईमध्ये शिकणारी नातीचा प्रताप

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन ला फिर्यादी नामे सौ. पोर्णिमा इंद्रनिल रंगारी वय ६९, रा. महात्मा फुले वार्ड यांनी तोंडी रिपोर्ट दिली की त्यांच्या धरून फिर्यादी व तिचे सुन नामे ज्योती रंगारी यांचे वेगवेगळे दोन कपाटातील लॉकर मध्ये असलेले ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगडया सुनेचे ३ अंगठया, दोन नथ व कानातील दोन टॉप्स सर्व २० ग्रॅम किंमत असा एकुण ८२ अम वजनाचा सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीविरूध्द सदरचा गुन्हा नोंद केला.

सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपी शोध कामी अनील राऊत, पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपासा दरम्यान यातील फिर्यादी व तिची सुन नामे ज्योती रंगारी यांनी दिलेल्या माहीतीवरून फिर्यादीची नात १) पूर्वा रंगारी वय १८ वर्ष शिक्षण बी.टेक. हल्ली मु.बुटीबोरी हिला विचारपूस केली असता तिने तिचे आजीची व आईचे कपाटात ठेवलेले वरील वर्णनांचे सोने आवश्यकतेनुसार टप्प्याटप्याने चोरून नेऊन तिचा मित्र आरोपी २) वंश प्रमोद राऊत वय १८ वर्ष रा. हिंगणघाट याला विकण्यासाठी देउन त्याने ते सोने त्याची आई आरोपी क्र. ३) रूपाली प्रमोद राऊत रा. हिंगणघाट हिचे माध्यमातून सोने जिंकुन दिल्याने आरोपी क्र. १ व २ यांनी सोने विकून मिळालेले ७,९७,००० रू. रकमेतून हॉटेलिंग व फोर्ड फिगो कंपनीची कार, बजाज एनएस २०० दुचाकी, आय फोन खरेदी केल्याचे सांगितले.

आरोपीतांकडून गुन्ह्यात सोने विकून आलेल्या पैश्याची विकत घेतलेला फोर्ड कंपनीची कार बजाज एनएस २०० दुचाकी व आय फोन जप्त केले तसेच आरोपीने विकलेले ८२ अॅम सोने सोनाराकडून जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व अनिल राऊत, पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने पोलीस स्टेशन येथील सपोनि दिपक वानखडे व सपोनी पद्ममाकर मुंडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे तसेच सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे, दिनेश बोथकर यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *