प्रत्येक सामान्य माणूस आपल्या आयुष्यभराची जमापुंजी घर बांधण्यासाठी खर्च करीत असतो. आणि त्यातही मातीमिसरित गुणवत्ताहीन रेती दुप्पट भावाने खरेदी करावी लागत असल्यामुळे आज प्रत्येक सामान्य माणसाला घर बांधकामाचे बजेट दोन ते तीन लाखाने वाढलेले आहे.मागील चार-पाच वर्षापासून रेती घाटांचे लिलाव प्रशासनाच्या लालफीत शाहीतील कायद्यामध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहे त्यामुळे मोठ्या आर्थिक लाभाची सवय प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी यांना लागल्याची चर्चा आज संपूर्ण जनतेमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. तरी महाराष्ट्र राज्य सरकारने रेती घाटांच्या लिलावा संदर्भात शासन परिपत्रक क्रमांक गौखनि १० /०१/२५ प्रक्र०५ ख १ नुसार
दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आज तारखेपर्यंत प्रशासनाने रेती घाट लिलाव संदर्भातील किती प्रक्रिया पूर्ण केल्या आहे याची माहिती घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील ट्रक चालक-मालक संघटनेचे सर्व सदस्य यांनी निखिल सातपुते, अविनाशजी काकडे यांच्या नेतृत्वात मा उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले.
तसेच रेती घाटाचे लिलाव प्रक्रियेच्या पूर्वतयारी मध्ये कुठलीही
दप्तर दिरंगाई आढळून आल्यास वर्धा जिल्ह्यातील सर्व ट्रक मालक लोहा सिमेंट विक्रेता कामगार आर्किटेक्चर इंजिनियर या सर्वांच्या सहकार्याने जय महाराष्ट्र युवा संघटन तर्फ निखिल सातपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला
यावेळी दिलीप नाईक, विपीन पांडे, अमोल रामटेके, क्रिष्णा नांदुरकर, कपिल नाईक, गोलू जगताप, गौरव पाटील, मंगेश भोंगाडे, अमर बेलगे, राजेश वरघणे, कन्हैया यादव, सचिन मेश्राम, विकी थोरात, भूषण सुरकार, अक्षय बुरांडे, राकेश भुतकर, प्रशांत उमरे, एजाज कुरेशी, प्रशांत नेहारे, देवा अरगुडे, श्रुतीक बोरकर, विशाल चौधरी, अमित झोड, निलेश कळंबे, प्रमोद उमाटे, अतुल मोटघरे, अंकित झांबरे, स्वप्नील नारसे, धीरज चव्हाण, यशोधन देशपांडे, इत्यादी सहकारी उपस्थित होते.