केळझरचे माजी उपसरपंच फारुख शेख व मित्र परिवार दहेगाव गोसावीचे माजी सरपंच संदिप वाणी माजी सरपंच तुळजापुर प्रमोद उमगिरे शिवसेनेचे किशोर जाधव अमीत तेलंग मिलींद गव्हाळे, गणेश धरमुळ, सुधाकर मेश्राम, प्रविण नखाते, सुनील नखाते सुदाम पवमवे, महेश तेलरांधे, राजेंद्र लाखे दर्शन नखाते शंकर करनाके अंकित ठोंबरे दिवाकर अवचट, पुरुषोत्तम तेलरांधे केळझर, वडगाव जुनगड, दहेगाव जंगली गोसावी, आमगाव, खडकि सेलडोह यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट बॉक्स उद्धवसेना प्रहार अपंग क्रांती संघटना, प्रहार संघटना, किसान अधिकार अभियानाच्या कार्यकत्यांसह विविध गावांतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
नंतर ही रॅली खडकी, सेलडोह मार्गे बुटीबोरी नागपूरकडे रवाना झाली. केळझर येथे फारुख शेख मित्रपरिवार व परिसरातील शेकडो शेतकर्यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह सोबत असलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे बायपासवर जंगी स्वागत केले. जेसीपिने वरून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ब्यांडवाजासह 1. फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. तर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर रॅलीतील शेतकर्यांना चहा व पाणी बाटलची व्यवस्था करण्यात आली.