नाचणगावमध्ये घराचे छत कोसळून 32 वर्षीय युवकाचा मृत्यू

पावसामुळे घडला भीषण प्रकार, मृत्यूने गावात शोककळा

नुकसानभरपाईची मागणी; प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा

मृतक चा शव पोस्टमार्टम करता पाठविला असुन रिपोर्टनुसरा नेमके कारण काय कड़ेल

नाचणगाव पुलगाव परिसरात पावसामुळे भीषण प्रकार घडला असून बडे प्लॉट परिसरातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास सततच्या पावसामुळे एका घराचे छत अचानक कोसळले. या घटनेत 32 वर्षीय युवक किरन बाबाराव भुजाडे यांचा छताखाली दबून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तिनाचे छप्पर, सिलिंग फॅन व छतावरील दगड विअचानक कोसळले. यात किरन भुजाडे हे थेट छताखाली दबले गेले. मागील खोलीमध्ये त्यांचे आई-वडील व मुले झोपलेले असल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. परंतु किरन भुजाडे यांना गंभीर दुखापत झाली असून ते घटनास्थळीच मरण पावले.

या अपघाताने संपूर्ण नाचणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांनी तातडीने प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून पीक व घरांचे मोठे नुकसान होत आहे. अशा घटनांमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *