हिंगणघाट – घर कुलूपबंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी येथील सिंधी कॉलनी परिसरात चोरी करत सात लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी ३०८ ग्रॅम सोन्याचे दागिने, दीडशे ग्राम चांदीसह रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
स्थानिक सिंधी कॉलनी येथे राहणारे दीपचंद जेहिमल पाखरानी हे कुटुंबासोबत राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता नागपूर येथे घराला कुलूप लावून गेले होते.
घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी समोरच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. वरच्या माळ्यावर असलेल्या कपाटातील सोन्याची चेन, ब्रेसलेट, तीन अंगठी, चार बांगड्या, मंगळसूत्र, महाराणी सोन्याचा हार, सोन्याच्या नेकलेस सेट, सोन्याच्या लहान अंगठ्या, सोन्याच्या दोन चेन, सोन्याच्या कडा, ब्रेसलेट, कानातले सात जोड, सोन्याचे चार क्वॉईन आदी सोन्याचे ३०८ ग्रॅम दागिने, चांदीचे १० सिक्कमे, पाच क्वॉईन, तीन चांदीचे तुकडे १५० ग्रॅम असे चांदीचे ३०० ग्रॅम दागिने तसेच दोन लाख रुपये, ४० हजार रुपये दोन लाख ४० हजार रुपये असे ३०८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३०० ग्रॅम चांदी दागिन्यांसह दोन लाख ४० हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लांबविली. सत्संग कार्यक्रमातून परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
दीपचंद पाखरानी यांनी यासंदर्भात हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी वर्धवरून तपासासाठी श्वास पथक, ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.