पिंपरी मेघे ग्रामपंचायत सुविधा केंद्र नूतनीकरणाचे लोकार्पण मेघना साकोरे-बोर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संजय गाते, पिंपरी मेघेचे सरपंच वैशाली गाैळकर, उपसरपंच गजानन वानखेडे, शितल भोयर, उमरी मेघेचे उपसरपंच सचिन खोसे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, अजय गाैळकर, सरपंच सतीश इखार, प्रदिप राेंदळे,संदीप कुलसरे, वंदना शंभरकर, विद्या कवसाळे, वनिता कोठाळे, सागर नेहारे, वैशाली नोहाटे, कुमुद लांजूरकर, वैभव चाफळे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींचा दर्जा सुधारावा, नागरिकांना आधुनिक सोई सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी शासनाच्यावतीने ग्रामपंचायतीसाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकास निधी देण्यात येते. सोबतच ग्राम समृद्ध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा ग्रामपंचायतींनी लाभ घेऊन विकासात्मक कामे करावी. आपले गाव आदर्श करून राज्यात नावलौकिक करावे, असे पुढे बोलतांना मेघना साकोरे-बोर्डेकर म्हणाल्या. पिंपरी ग्रामपंचायत शहरालगत असल्यामुळे नागरिकांचा चांगल्या सोई निर्माण करून देण्यासाठी ग्राम पंचायतीनी भूयारी गटार योजनेसाठी प्रस्ताव सादर केल्यास तात्काळ मंजूर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मेघना साकोरे-बोर्डेकर यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेले पिंपरी मेघे ग्राम पंचायतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या काळात ग्राम पंचायतीच्या असलेल्या समस्यांचे निराकरण करून ग्राम पंचायतीचे शून्य बिल करण्यासाठी १६ मेगावॅटचा सोलर प्रकल्प सुरु करण्यात येईल. तसेच टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून पिंपरी मेघे परिसरात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरु करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायत मार्फत सुरु करण्यात आलेल्या वाचनालयातील अभ्यासिकाकरीता फर्निचरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले. यावेळी संजय गाते, सचिन खोसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पिंपरी ग्राम पंचायत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली गाैळकर यांनी केले तर संचालन विनोद महाजन यांनी केले.