चिचघाट-आजंती रोडवरील खड्डा मोलमजूरी करणारे विकास तेलंग यांनी बुजविला

 लोकांना होणारा त्रास ओळखून सामाजिक बांधिलकीतून पुढाकार, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

हिंगणघाट विचपाट ते आजंती या मार्गावरील काही खडीकरण महिन्यांपूर्वी झाले सिमेंट ढोल्यावर धातुरमातूर माती मुरूम टाकल्याने पावसामुळे तेथील माती बल्यामुळे या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मुळे मोठा खड्डा पडल्यामु शेतकऱ्यांना व दुचाकी मोठ्या वाहणाला अडचणींचा सामना करावा लागत होता.

या खड्ड्यामुळे रात्री अपघाताचीही शक्यता वाढली होती. ही परिस्थिती पाहून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मोलमजुरी करणारे आजंती येथील विकास तेलंग यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डा आजूबाजूचे गोटे, मातीमुरूम टाकून समतल केला.

मोलमजुरी करणारे विकास तेलंग यांचे याकार्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या खडीकरण रस्ता कडे कुणाचेही लक्ष नसून चिचघाट आजंती रोड आजंती गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्याचे मजबुत खडीकरण डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे अशी मागणी होत आहे मोलमजुर विकास तेलंग यांनी स्वतःच्या मेहनतीने खड्डा बुजवून प्रेरणादायी कार्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *