कांशीराम जयंती निमित्त वर्धेत बसपा चा कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : आमचे महापुरुष फुले, शाहू, आंबेडकर यांनी जी परिवर्तनाची चळवळ चालविली त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला कांशीरामजींनी राष्ट्रीय पातळीवर आणून ठेवली, त्यामुळे चळवळीला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन विदर्भ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्या निमित्त बसपाचे केंद्रीय कॉर्डीनेटर व महाराष्ट्राचे प्रभारी राज्यसभा संसद रामजी गौतम यांनी केले. रामजी गौतम हे बहुजन समाज पार्टीच्या वतीने कांशीराम यांच्या ९२ व्या जयंती निमित्त बहुजन समाज पार्टीने विदर्भस्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे भव्य आयोजन केले होते त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष सुनील डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्याची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ते शक्य करण्याचे काम मान्यवर कांशीरामजी यांनी केले. आणि म्हणूनच आपले महापुरुष व विचारधारा सोडून काँग्रेस भाजपा व सपा सारख्या पार्ट्या कांशीराम जयंती साजरी करायला लागल्यात हे आपल्या चळवळीचे यश असले तरी यांच्यापासून सावध राहावे असे सांगितले. सोबतच राहुल गांधी एखाद्या पप्पू सारखे बोलत असल्याचीही यावेळी एड सुनील डोंगरे म्हणाले.

कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मुकुंददादा सोनवणे व महिला नेत्या डॉक्टर विद्याताई राईकवार यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ प्रदेशचे इन्चार्ज डॉक्टर मोहन राईकवार यांनी, सूत्रसंचालन.. जिल्हा सचिव सुरेश दुधे यांनी तर समारोप जिल्हा अध्यक्ष अनमोदर्शी भैसाने यांनी केला. मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे कोध्यक्ष अब्दुल रौफ भाई, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, पृथ्वी शेंडे, प्रदेश सचिव दादाराव उईके, विवेक हाडके, प्रफुल मानके, दीपक पाटील, महेंद्र मकेश्वर, मुस्लिम भाईचारा कमेटी चे झोन प्रमुख मोहसीन शेख, ओबीसी नेते स्वरमिश खडसे मंचावर उपस्थित होते. विदर्भातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले सदस्य उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेतील उपस्थिती लक्षणीय होती. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून आपापल्या साधनाने कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव किशोर मेंढे, जानरावजी ठोंबरे बामसेफ संयोजक, मंदाताई नाखले जिल्हा संयोजिका, प्रज्ञा दुपट्टे, जिल्हा प्रभारी, वैशाली कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भगत, मनोज माहोरे जिल्हा महासचिव, सुधाकर जुनघरे, निखिल भगत, शरद वानखडे सर इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अथक प्रयत्न केले. कार्यक्रमात.. विकास . राजा या कलावंताने उपस्थितयांचे जोरदार प्रबोधन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *