खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात नारा टी-पॉइंटवर अमरावती -नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन: सुराज्य शेतकरी संघटनेसह जयदादा बेलखोडे मित्र परिवाराचा जाहीर पाठिंबा
कारंजा : तालुका सन २०२६च्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ तसेच कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अमरावती-नागपूर महामार्गावरील नारा टी-पॉइंट, कारंजा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अमर काळे करणार आहेत. कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी तालुक्याचा ताраडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, तातडीची आर्थिक मदत तसेच इतर आवश्यक शासकीय सवलती व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
तसेच वाघाच्या हल्ल्याում मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन सरकारने पीडित कुटुंबांना भरीव मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या आंदोलनाला सुराज्य शेतकरी संघटना व जयदादा बेलखोडे मित्र परिवाराने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेच्या वतीने जयदादा बेलखोडे व हर्षाताई बेलखोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी होणाऱ्या या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त यादीत कारंजाचा समावेश, शेतकऱ्यांना तातडीची मदत, सरसकट कर्जमाफी आणि वाघाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत या मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनात शेतकरी, नागरिक व विविध संघटनांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडी तसेच स्वराज्य शेतकरी संघटना जयदादा बेलखोडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे