निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा व पीएचसीचे ई- भूमिपूजन

आरोग्य राज्यमंत्र्यांसह पालकमंत्री उपस्थित राहणार अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा होणार सन्मान
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत (निरामय वर्धा अभियान) उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच साटोडा व बोरगाव मेघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भूमिपूजन दि. २६ ऑक्टोंबर रोजी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थित होणार आहे.

सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृह येथे दुपारी १२वाजता आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. अभिजित बंजारी, आ. सुधाकर अडवाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी सान्मश्री सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कुलगुरु डॉ. ललीतभूषण वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या निरामय वर्धा अभियानात (मोतीबिंदू विरहित अभियान ) उत्कृष्ठ कामगिरी कामासाठी जिल्हाधिकारी वामथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, महात्म आय हॉस्पीटल नागपूर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, इंडियन मेडिकल असोशिएशन, वर्धा आप्याल्मिक सोसायटी, निमा वर्धा या संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश मरकड, विश्वत्रिवेणी कॉटस्पिन प्राईवेट लिमिटेड हिंगणघाट, सर्व तालुका प्रशासन, निरामय वर्धा अभियानचे जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, आकांक्षित तालुका कारंजा समन्वयक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, आशा स्वयंसेविकांना मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *