सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. प्रभारी ठाणेदार श्री सदाशीव ढाकणे, साहेब व श्री पंकज वाघोडे साहेब, पो. स्टे सावंगी यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे अज्ञात आरोपीचे व चोरीस गेलेल्या मालाचे शोधात असताना मुखबीरकडून
मिळालेल्या माहितीवरून संशईत महिला पुजा शांताराम शिंदे वय २४ वर्ष हिचे राहते घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरझडती मधून गुन्हयातील चोरीस गेलेला वरील प्रमाणे सेरा कंपनीचे नळफिटींगचे साहित्य एकुण जु. किं. १,२२,६४८ / रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने व आरोपीने गुन्हा केल्याचे पंचासमक्ष कबूल केल्याने आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा यांचे निर्देशाप्रमाणे मा प्रभारी ठाणेदार श्री सदाशिव डाकणे सा पोलीस स्टेशन सावंगी मेघे, पो.उप.नि. विशाल डोणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पंचभाई, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, महिला पोलीस अंजली गाडेकर यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचमाई हे करीत आहे.