शुभेच्छा मंडपाच्या भेटीदरम्यान मुस्लिम सोशल फोरमचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते, मुस्लिम सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले… मुस्लिम बांधवांनी दिलेल्या आत्मीय सत्कारास मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रतिसाद देत सर्वांना सद्भावनेचा व समाजकल्याणाचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले. मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी मंत्री महोदयांचे आभार मानले व पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने सर्वांना ईद ए मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा! तर सेवाग्राम येथे सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांचे स्वागत करण्यात आले.
मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा मंडपास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. सेवाग्राम येथे सुबानियां अरबी मस्जिद कमिटीच्यावतीने सेवाग्राम मेडिकल चौकातून मिरवणुक काढण्यात आली. तर वर्धा येथे बजाज चौकातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचा समारोप जामा मस्जिद जवळ करण्यात आला. ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने मुस्लिम सोशल फोरमच्यावतीने उभारण्यात आलेल्या मंडपाला आज वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.