वयोवृद्ध महिलेेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरिने हिसकावून नेणाऱ्या अट्टल आरोपीस अटक

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : ‘पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी हिंगणघाट शहरात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरिने हिसकावून नेणाऱ्या अट्टल आरोपीस अटक करून त्याचे ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.’

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे दि. ०९/०८/२०२६ रोजी फिर्यादी नामे मनोज रमेशचंद्र सिंघवी रा. नेहरू वार्ड, हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, त्यांची आई नामे इंदुमती सिंघवी वय ७४ वर्ष हि सकाळी ०६/३० वा. सुमारास कारंजा चौक ते तुकडोजी चौक रोडवर मॉर्निंग वाक करीत असताना एक अनोळखी २५ ते ३० वर्षा वयोगटातील अंगात निळसर काळापट शर्ट व तोंडाला बांधून असलेल्या इसमाने त्याचे ताब्यातील मोटर सायकलने पाठी मागून येवून फिर्यादीचे आईचे गळ्यातील सोन्याची १७ ग्रॅम वजनाची चैन की. ६८,०००/रू. ची जबरिने हिसकावून पळून गेला. असे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप.क्र. १३०२/२६ कलम ३०४(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक व पो.नि. अनिल राउट सा. यांचे सुचनेप्रमाणे पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पो.अमंलदारांनी अज्ञात आरोपीचे शोध घेणेकरिता हिंगणघाट शहरातील, आजूबाजूचे गावातील तसेच शहरा लगता जाणाऱ्या सर्व हायवे रोडचे सि.सि.टि.व्हि. फुटेजची सुक्ष्म निरिक्षण करून, मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर गुन्हा हा समतानगर, नेरी दुर्गापूर चंद्रपूर येथील राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक वय ४० वर्ष याने केला असल्याचे खात्री पटवून त्यास चंद्रपूर येथून ताबात घेवून त्यास गुन्ह्याचे संधाने विचारपुस केली असता.

त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगून गुन्ह्यातील माल हा चंद्रपूर येथील सोनार दुкаनात विकल्याचे सांगून आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्पलेडर कंपनीची मो.सा. क्र.सी.जी. ०७ एल.झेड, ७१३० जुनी वापरती की. ५०,०००/रू. आरोपी हा गुन्हा करतेवेळी परिधान करून असलेले कपडे तसेच सोनार दुकानदारां यांचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या रवा(लगड) वजन १६.९४० मीली ग्रॅम की. २,१४,४००/रू. असा एकूण की. २,६४,४००/रू.चामाल जप्त करून सदर चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणला तसेच आरोपीने विचारपुस दरम्यान त्याने या अगोदर सुद्धा भंडारा जिल्ह्यात अशाच प्रकारचे दोन वयोवृद्ध व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळ्या सुद्धा सकाळ दरम्यान जबरिने हिसकावून नेल्याचे सांगितलेले आहे. वरून भंडारा पोलिसांना त्याबाबत माहिती दिली आहे.

सदरची कारवाई. पोलिस अधीक्षक वर्धा मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक वर्धा मा. श्री. सदाशिववाधमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनामध्ये पो.स्टे. हिंगणघाट येथील पो.नी.श्री. अनिल राउट साहेब यांचे आदेशाने गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पो.हवा.नरेंद्र डहाके, पो.ना नरेंद्र आरेकर, पो.ना. निलेशसिंग सुर्यवंशी, पो.कॉँ. सागर सांगोले, पोकाँ. दिपक मस्के, पोकाँ. अनंत हराळ यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा नरेंद्र डहाके पो.स्टे. हिंगणघाट हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *