जीटी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला भीषण आग:सुदैवाने जीवितहानी नाही

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : नागपूरहून चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. सिंदी रेल्वे आणि तुळाजापूर दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीच्या शेवटच्या डब्यामध्ये पार्सल व्यवस्था होती. त्यासोबतच या डब्याला घाटाचा (गार्ड/ब्रेक व्हॅन) डबा जोडलेला होता. अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबरात पसरली.

घटनेची माहिती मिळताच सिंदी रेल्वे येथील अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *