मिळालेल्या माहितीनुसार, सलीम शहा (वय २४, आर्वी) असे मृताचे नाव आहे. निखिल बुरे रा. हरदोली असे आरोपीचे नाव सांगण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून दोघांत वाद झाल्याची माहिती कळते.वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यातून निखिल बुरे याने धारदार शस्त्राने वार करत सलीम शहा याच्यावर वार केले.गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने आरोपीस ताब्यात घेतले.
धारदार शस्त्राने आर्वी येथे युवकाची हत्या
आर्वी : शहरात दिवसाढवळ्या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली.