वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, २० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा: वैनगंगा नदीपात्रातून अवैधिरित्या चोरीची पांढरी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालका विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी ट्रकसहित २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निक गुन्हे शाखा पथकाने समृद्धी महामार्गावर कोर्टंबा शिवारात केलेली.

गस्त सुरू असताना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समृद्धी महामार्गावरील कोर्टंबा शिवारात मुंबई कॉरीडोर परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी एम.एच. ४४ बी.जेड. ३६३५ क्रमांकाच्या ट्रकची थांबवून तपासणी केली. त्यामध्ये १ ब्रास वाळू मिळाली. त्याच्याकडे रॉयल्टी नव्हती. पोलिसांनी ट्रक, वाळू असा २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी चालक सय्यद नईम सय्यद मोहम्मद (वय ३६), रा. छायनगर, अमरावती, मालक रिजवान हुसेन रा. अमरावती या दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वाळू वैनगंगा नदीचे पात्रातून मूल जिल्हा चंद्रपूर येथून आणल्याची माहिती पुढे आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भुवन निमोंट, अमोल नगराळे, मंगेश चावरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *