भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारे संचालित कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली अंतर्गत सन २०२५-२६ दरम्यान देवळी तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, एकपाळा येथे शेतकरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री. किशोर तेलरांथे यांच्या शेतावर प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कटारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला, याप्रसंगी श्री हनुमान मंदिर, एकपाळा चे अध्यक्ष श्री. प्रकाश करोेटकर, प्रगतिशील शेतकरी श्री. शरद आदमाने, श्री. प्रभाकर आत्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कापूस उद्योगाच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी जागरूकता निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने जागतिक कापूस दिवस साजरा केला जातो. सघन लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून १०-२०% उत्पन्न पारंपारिक पद्धतीपेक्षा जास्त येणार तसेच पिकांची कर्नापी बद्दल माहिती देत कापसाचे बोंड मोठे असल्यास धाग्याची गुणवत्ता उत्तम राहते व सघन लागवड पद्धतीमध्ये शिफारशीतप्रसंगी श्री हनुमान मंदिर, एकपाळा चे अध्यक्ष श्री. प्रकाश करोेटकर, प्रगतिशील शेतकरी श्री. शरद आदमाने, श्री. प्रभाकर आत्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कापूस उद्योगाच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी जागरूकता निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने जागतिक कापूस दिवस साजरा केला जातो. सघन लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून १०-२०% उत्पन्न पारंपारिक पद्धतीपेक्षा जास्त येणार तसेच पिकांची कर्नापी बद्दल माहिती देत कापसाचे बोंड मोठे असल्यास धाग्याची गुणवत्ता उत्तम राहते व सघन लागवड पद्धतीमध्ये शिफारशीतलागवडीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळते तसेच कपाशीमध्ये होणारी अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी मेपिकोट क्लोराइड घटक असलेले वाढ नियंत्रक द्यावेव पात्यागळ थांबवण्यासाठी नेपथअलिक ?सिटिक? सिड ची फवारणी करावी व १० दिवसाचे पीक असताना शेंडा खुडणे फायदेशीर आहे तसेच विदर्भातील जमीन व हवामान हे सघन लागवड पद्धतीसाठी योग्य आहे असे मार्गदर्शन डॉ. जीवन कतोरे यांनी केले.
पीक संरक्षण विशेष विशेषज्ञ डॉ. नीलेश वशगिरे यांनी पी. बी. नॉट तंत्रज्ञाना विषयी माहिती देत कपाशीतील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तसेच कामगंध सापळे वापरल्याने कीड नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे करता येते या विषयी शेतकऱ्याना सांगितले तसेच येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये पीक व्यवस्थापन करताना बीज प्रक्रिया बद्दल विस्तृत माहितीदिल्ली. प्रगतिशील शेतकरी श्री. विजय आंबटकर यांनी पी. बी. नॉट तंत्रज्ञानामुळे झालेला फायदा या विषयी अनुभव शेतकऱ्यानां सांगितला. श्री. शरद आदमाने यांनी सघन लागवड पद्धती बद्दल अनुभव सांगत एकरी झाडांची संख्या वाढवल्यास व योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात हमखास वाढ होईल अशी खात्री शेतकऱ्यांना दिली. याप्रसंगी शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी क्षेत्र भेटीदरम्यान कपाशी पिकांचे निरीक्षण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विशेषज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले कार्यक्रमाच्या यश्वास्ते करिता श्री किशोर ढगलमुगले , श्री गणेश वायरे, श्री वसीम खान, श्री नितीन कोपरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.