तीन सुवर्णपदकासहित यशवंत महाविद्यालयातील एकूण 18 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत!

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे -वर्धा : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या उन्हाळी – २०१५ च्या परीक्षेत महाविद्यालयातील विविध पदव्युत्तर विभागातील तीन सुवर्णपदकासहित एकूण १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

महाविद्यालयातील विविध विभाग व त्यात मेरीट आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे दिली आहेत. मराठी विभाग निवेदिता राजेंद्र फुसाटे (प्रथम मेरीट) समाजशास्त्र विभाग. कु. चैताली जगदीश श्रीरंग ( सहावी मेरीट) कु. काजल बाळासो पाटील (आठवी मेरीट) राज्यशास्त्र विभाग अक्षय दिवाकर फुलझेल (सहावा मेरीट) अर्थशास्त्र विभाग. कु. नब्रता महेंद्र उमाटे (दुसरी मेरीट) गृहअर्थशास्त्र विद्या सुधाकर उमाटे ( तृतीय मेरीट) इतिहास विभाग. कु. साक्षी वीरेंद्र लोखंडे (प्रथम मेरीट) कु.दीपाली विठ्ठलराव चौधरी ( तृतीय मेरीट ) कु. आसावरी अनिल भनवे (नववी मेरीट) व्यवस्थशास्त्र विभाग कु. एकता कमलाकर मारवाडे ( द्वितीय मेरीट) कु. मिताली गोरेलाल टोपो ( तृतीय मेरीट) विविध विभाग.

पूजा मंगेश शालिग्राम ( प्रथम मेरीट) विद्याधर भगीरथ काळकाकर (दुसरा मेरीट) विशाल हेंमतराव देशमुख (तृतीय मेरीट) महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे मा. समीर भाऊ देशमुख, अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा मा. सुरेशभाऊ देशमुख, माजी आमदार, माजी अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा मा. सतीशराव राऊत, उपाध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी तथा प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे या सर्व मान्यावरांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील तसेच संस्थेच्या अध्यक्ष, समीरभाऊ देशमुख, लोकनेते व माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख तथा प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे तसेच विभाग प्रमुखांना व विभागातील सहकारी प्राध्यापकांना दिले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *