सेलू-सुकळी स्टेशन मार्गावर धोकादायक स्पीड ब्रेकर:नागरिकांच्या जीविताला धोका

दै. प्रतापगडचे वारे / अभय बेदमोहता
सेलू : सेलू ते सुकळी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या दोन्ही कडील रस्त्यावर स्पीड ब्रेकरमधील लोखंडी खिळे उघडे पडल्याने वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. हे उघडे खिळे नागरिकांच्या जीविताशी खेळणारे ठरत आहेत.

वाहनधारकांना मनस्ताप
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर वारंवार पंक्चर होत असून, वाहनधारकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खिळे दिसून येत नसल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रशानाकडून दुर्लक्ष
या भागात घडणाऱ्या टायर पंक्चरच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक अधिकारी याच मार्गावरून नियमित ये-जा करतात, मात्र त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाने त्वरित या धोकादायक स्पीडब्रेकरची पाहणी करून उघडे पडलेले खिळे काढून टाकावेत किंवा सुरक्षित पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *