प्रतिनिधी/ वर्धा : अतिवृष्टी, येळो मोर्डीक आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आद आठ एकरावरील आपल्या सोयाबीन पिकाला आग लावली. या धक्कादायक घटनेनंतर वर्ध्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते अमर काळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, शेतकऱ्यांच्या व्यथेला आवाज दिला आहे.
‘शेतकऱ्यांनी ही कृती निषेध म्हणून केली आहे, असे वाटते. शेतकरी हताश झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. येळो मोर्डीकसारख्या आजारांनीही पिके नेस्तनाबूद झाली आहेत. एवढं मोठं असूनही सरकारकडून कोणतीही भरीव मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करत आहे पण प्रत्यक्ष फळ शून्य आहे. शेतकऱ्यांचे रस्त, शक्तिपात, मोठे धक्के याकडे लक्ष दिले जातेय. पण सध्या सगळ्यात मोठी गरज आहे ती शेतकऱ्याला आधार देण्याची. हे सर्व बाजूला ठेवणं आणि आधी शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवा.’
अमर काळेंनी सरकारला थेट इशारा दिला की, ‘जर सरकारने त्वरित आणि ठोस मदत केली नाही, तर यापुढे परिस्थिती हाताबाहेर जाईल. शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो.’ यातून मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही.
शेवटी, त्यांनी शासनाला आवाहन केले की, ‘लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अन्यथा परिणाम गंभीर होतील.’