नालंदा विद्यापीठ पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार २०२६ डॉक्टर विनोद विनायकराव देशमुख यांचा सन्मान

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : नालंदा विद्यापीठ पुणे यांच्यावतीने पत्रकार भवन पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२० प्रख्यात नाडी रोग तज्ञ व आयुर्वेदा प्रॅक्टिशनर डॉक्टर विनोद विनायकराव देशमुख यांना मानाचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आयुर्वेदिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य रुग्णसेवेतील निष्ठा तसेच समाज उपयोगी आरोग्यसेवा याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार सन्मान देण्यात आला.

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नितीन बडगे, राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र चित्रपट प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग तसेच हॉलिवूड कॉलेज हॉलिडे कंपनीचे संचालक यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. प्रमुख पाहुणे म्हणून ह्युमन राइट्स कौन्सिल ऑफ इंडिया व राष्ट्रीय समिती करेक्शन अँड कंट्रोल चे प्रमुख डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर गीता जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक संदीपिका डॉक्टर अर्चना देसाई तसेच मराठी चित्रपटातील चिमुकली अभिनेत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन टॅलेंट कट्टा व नालंदा विद्यापीठ पुणे चे संस्थापक डॉक्टर दीपक दादाराव जाधव यांनी केले. राज्याच्या विविध भागातून विशेष विदर्भातून मोठ्या संख्येने मान्यवर व पुरस्काराचे उपस्थित राहिले. सोहळ्याविषयी उत्साहाचे वातावरण लाभले. सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या या गौरव करण्यात आला. डॉक्टर विनोद देशमुख यांच्या सन्मानामुळे आयुर्वेद क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून समाजोपयोगी आरोग्य सेवेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला समूह उत्साह पूर्ण वातावरणात झाला. त्यांच्या कार्याचा गौरव डॉ. सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य व डॉ किशोर बमनोटे सर आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व डॉ विपुल पाटील वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ विनायक मेथे आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य विदर्भ यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *