ओबीसी आरक्षण बचावकरिता धडक मोर्चा मोर्चांमध्ये विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

वर्धा : वढ्यात ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षणकरिता धडक मोर्चा काढण्यात आला. एकच मिशन ओबीसी आरक्षण चे नारे देत मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या चौकातून मोर्चाची सुरूवात झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यावरून मोर्चा नेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आला. राज्य सरकारने आरक्षणाबाबतचा नुकताच काढलेला शासन आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात आला. ओबीसी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला.

आंदोलनात तुषार पेढारकर, बाळकृष्ण माहुमकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, अनंत मोहोड, सुनील कोहळे, धैर्यशील जगताप, नितीन चौधरी, अर्चना भोमले, सुधीर पांगुळ, संदीप किटे, प्रणय कदम, प्रवीण पेठे, गोविंद दिघीकर, नितीन चौधरी, नीलेश तिजारे, मयूर हकरे, अशोक चोपडे, राजेंद्र कळसाईत, जनार्दन देवतळे, पुरुषोत्तम खवासराव, पंकज कोल्हे, धीरज चनेकार, सोनाली कोपुळवार, अरुणा धोटे, प्रदीप खुळे, विनोद दांडेगे, गणेश चोपडे, अनिल पुरसदकर, राहुल केंकारे, अशोक अडबेलें, युवराज पोहेकर, दिवाकर इंगळे, अंकुश पिंपरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलनात ओबीसी, सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *