स्नेहधामातून नेहमीच नवीन ऊर्जा मिळाली- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा : आपल्या सर्व्या आशिर्वादांमुळे तीन वेळा आमदार व मंत्री होण्याची संधी मिळाली. आपल्या कृपेतून मी कधीच उतराई होवू शकत नाही. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब तर माझ्यासाठी संकटमोचक राहिले आहे. आपल्या या प्रेमापोटीच मला कार्य करण्याची उर्जा मिळत असते. स्नेहालयचा परिसर नवीन दृष्टी देणारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह, शालेय, खनिकर्म, सहकार, गृहनिर्माण राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

प्रभाग ५ स्नेहनगर मधील स्नेहालयाच्या येथील सुरक्षा भिंत व सौंदर्यीकरणासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.त्याबददल त्यांचा सत्कार स्नेहालयच्या वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी सौ. कांचनताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी म्हणून स्नेहालयच्या अध्यक्ष डॉ. दिप्ती काशिकर, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना लांडगे, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश किटे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी उप नगराध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, वर्धा विधानसभा प्रमुख प्रशांत खुळे, वर्धा विधानसभा अध्यक्ष निलेश पोहेकर, माजी नगरसेवक बंटी गोसावी, सौ. अर्चनाताई लाई, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष ॲड. शितलताई भोयर, श्रीमती लोहकरे, सुनिताताई हंडावू, स्वाती ठाकरे, ताराताई खंडारे, जगदीश डावची, माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये पक्षाची टिकीट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. या कठीण प्रसंगी नितीन गडकरी साहेब ईश्वरासारखे मदतीला धावून आले. लोकनेते दाजी मेघे साहेब यांचे देखिल यात मोठे योगदान होते. मला आमदार बनविण्यात त्यांचे व आपले सर्वांचे मोठे योगदान आहे. स्नेहालयचा परिसर सुंदर असा परिसर आहे. स्नेहालयमध्ये जेव्हां आलो तेव्हा येथुन नवी उर्जा घेऊन गेलो आहे. उर्जा देण्याचे कार्य येथे होते.

राज्यमंत्री म्हणून विकासाच्या अनेक नवीन योजना अंमलात आणण्याची संधी मिळाली. स्नेहालयच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले, या भागात विरोधक असताना देखील येथील लोकांनी मला आशीर्वाद दिले आहे. त्यांचे ऋण माझ्यावर आहे. याप्रसंगी सौ कांचनताई गडकरी यांनी देखील स्नेहालयच्या कार्याची स्तुती केली. जनतेच्या हिताचे कार्य केली की, जनता त्या नेत्याला कधीच विसरत नाही, असे त्या म्हणाल्या. केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी नेहमीच विकासाचे कार्य केले आहे.

त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख देश व विदेशात झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *