बोर व्याघ्र प्रकल्पातून रोजगार देताना स्थानीकांचा प्राथम्याने विचार करा

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत राहाटी गेटचे उद्घाटन करतांना खासदार अमर काळे यांनी विदर्भातील कौंडण्यपूर हे महत्त्वाचे तिर्थक्षेत्र आहे. जेथून श्रीकृष्णाने रुख्मीनीचे हरण केले अशी पुराणात नोंद आहे. परंतु एवढ्या मोठ्या तिर्थक्षेत्राची प्रसीध्दी न झाल्याने हे तिर्थक्षेत्र मागे पडले आहे. यासोबतच सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचा आश्रम या सेवाग्राम आश्रमातून महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची योजना आखली. या आश्रमातून गांधीजींनी स्वतः वास्तव्य करुन स्वातंत्र्यकालीन अनेक लढ्याचे नियोजन या सेवाग्राम आश्रमातून केले. ज्या महात्मा गांधींना देशच नाही तर जग राष्ट्रपिता या नावाने ओळखतात त्या महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचे पुरेशी प्रसिद्धी न झाल्याने या आश्रमाची परिस्थिती आज काय आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.

त्यामुळे पत्रकार म्हणून एक मोठी जबाबदारी असते. दुसरा विषय म्हणजे बोर व्याघ्र प्रकल्पातून अनेक लोकांनी आपली घरदार सोडून, जमिनी सोडून स्थलांतरीत झाले आहे. त्यांना जंगला बाहेर पुनर्वसित केले आहे. परंतु यावेळी काम करण्याची संधी मिळते, रोजगार उपलब्ध होतो त्यावेळी मात्र स्थानिकांना डावलून इतरांना ह्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात.

आर्वी मतदार संघात आतापर्यंत १० ते ११ लोकांचे वाघांनी बळी घेतलेले आहे. एक ते दोन लोकांचे अस्वलांनी बळी घेतले आहे. अशी घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरतो यावर ज्यावेळी वनविभागाला अशा ठिकाणी जाण्याची अडचण निर्माण होते त्यावेळी त्यांना या ठिकाणी पोचण्याकरीता स्थानिक लोकांचीच मदत घ्यावी लागते व स्थानिक लोक सुद्धा मोठ्या मनाने मदत करतात. परंतु येथे जेव्हा रोजगार निर्मिती होते काही छोटी मोठी कामे काढली जातात त्यावेळी मात्र स्थानिक लोकांना डावलून बाहेरील राज्यातील लोकांना आणून कामे केली जातात.

यात स्थानिक लोक मात्र प्रशासनाच्या अट्टापायी केवळ बघ्याची भूमिका घेतात. प्रशासनाने याबाबतीत सकारात्मक विचार करुन बाहेर राज्यातील किंवा बाहेरील लोकांना कामे देण्यापेक्षा स्थानिक लोकांना जे या भागात राहतात व या प्रकल्पात ज्यांनी आपली घरे व शेतीवाडी दिली त्यांचे तरी या ठिकाणी निश्चित विचार व्हावा त्यामुळे त्यांना रोजगार मिळून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन होईल. परंतु हे होतांना दिसत नाही. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे येथे ज्या लोकांची या भागात शेती आहे त्यांना जिवाच्या भीतीपोटी वाघाच्या दहशतीमुळे शेतात रात्रीला जागली जाता येत नाही व नाही गेलं तर रोही, रानडुक्कर संपूर्ण पिकांची नासाडी करते अशा दुहेरी अडचणीत या भागातील शेतकरी सापडला आहे.

त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कसणे बंद केले आहे. कित्येक जमिनी सुपिक असूनही व चांगले पिक येत असूनही केवळ वाघाच्या दहशतीमुळे जीवाच्या भीतीपोटी पडीक आहे. यावर सुद्धा प्रशासनाने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. श्री. पंकज भोयर, आर्वी विधान सभेचे आमदार श्री सुमितजी वानखेडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री सुधीरजी दिवे यांचेसह स्थानिक लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *