वर्धा (जिमाका): सेलू तालुक्यातील विविध ठिकाणच्या पांदणरस्त्याचे बांधकाम, ग्रामीण भागातील नागरीकांसाठी भुमिपुजन अंतगर्त रस्ते व नाली तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सेलू तालुक्यातील जिल्हा माहिती व मंगल कार्यालयाच्या जिल्हा परिषदच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार दादासाहेब केचे, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सुधीर दिघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित अनुदान योजनेतून अकोली, बाभूळगाव, महाबळा, धानोली मै, शिरसमी, गोविंदपूर, जयपूर, जिवराडी, खडका, जुगणाद, मोहगांव, सोर्डी, चारमंडळ, वडगाव व, रिधोरा, माई, वडगाव, साळंई पे, खरी का, टाकळी झ, वाहीतपूर, धोत्रा, केळझर, माई, तुळजापूर वधाळा, जुनोना, किंदळा, हेलाडी, बोरगाव, टाकळी झ, हिंगणी, कान्हपूर, रमना, खैरी का., जामणी, नरबगाव, कान्हपूर, कान्हापूर या गावातील रस्त्याचे तसेच स्थानभूमी सौंदर्यीकरण, आम्रपोचायत भवन संरक्षण भिंत अशा ४० विविध ५ कोटी ५५ हजार रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन झाले.
जिल्हा परिषदेच्यावतीने सरसबाधा ग्रामिण योजनेतर्गत १८ कोटी ५८ लाख रुपये, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत १७ रस्ते २ कोटी ६० लाख रुपये व जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ६ रस्ते ३ कोटी ३० लाख रुपयांच्या रस्तें बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात एकूण विविध १७ विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडगवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश अंधोरे, तहसिलदार मल्लिक बिरानी यांच्यासह सेलू तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.