आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत तळेगाव येथे जिल्ह्यातील दुसरे महाारोग्य शिबिर

महसूलमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन दोन दिवस विनामूल्य आरोग्य तपासणी व चाचण्या नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

वर्धा (जिमाका) : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील दुसरे महाारोग्य शिबिर दिनांक ८ व ९ ऑगस्ट रोजी आष्टी तालुक्यातील तळेगाव (शाम.) येथे पी.आर.पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, खासदार अमर काळे, आ.अभजीत वंजारी, आ.सुधाकर अडबाले, आ.अरुण लखानी, आ.समीर कुणावार, आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच ছাতাखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, मेंदुरुग् तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, पोटाचे विकार तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही कार्यरत राहणार आहे.

शिबिरात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीपासून उपचार व औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिराच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणीसाठी वेगवेगळी दालने राहणार आहेत. शिबिरास येताना नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड किंवा आधारकार्ड, रेशन व मोबाईल नंबर सोबत आणावा व शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *