यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणी केली तसेच आश्रमातील गोशाळेला भेट दिली. गोशाळेत असलेल्या विविध जातीच्या गाईबद्दल सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच आश्रमातील सोईसुविधांबाबत चर्चा केली.
महात्मा गांधींनी दिलेला शांती व अहिंसेचा संदेश आजच्या तरुण पिढीने मनात रुजविणे आवश्यक आहे, असे मत डॉ. भोयर यांनी यावेळी व्यक्त केले.