आष्टी तालुक्यात पदवी वाटपाने सेवा पंधरवडाच्या समारोप

आ.दादाराव केचे व आ.सुमित वानखेडे यांची उपस्थिती

वर्धा (जिल्हाका): छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या अभियानांतर्गत आष्टी तहशील कार्यालयाद्वारे महसूल सेवा पंधरवडा उत्साहने राबविण्यात आला. तालुक्यातील सुजातपूर येथे आ.दादाराव केचे व आ.सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना पदवी वाटप करून पंधरवड्याची सांगता करण्यात आली.

तालुक्यामध्ये टप्पा एक अंतर्गत ४९३ पांदन रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. चार मंडळात रस्ते अदलबदल राबविण्यात आली तर ३८ पांदन रस्ते अतिक्रमण मुक्त व ६ नवीन रस्ते निर्गमित करण्यात आले. टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुजातपूर, धुवाडा, भिनूर येथे पट्टेवाटप प्रस्ताव तयार करण्यात आले.

टप्पा ३ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांमध्ये

दाखल्यांची शाळा राबविण्यात येऊन शिधापत्रिकाधारकांना घरपोच धान्य सेवा देण्यात आली. जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत एकूण ८५५ सातबाराचे ध्येय ठेवून कार्यवाही करण्यात आली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे एकूण १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच आधार डीबीटीचा कॅम्प तहसील कार्यालयात राबविण्यात आला.

तालुक्यातील सुजातपूर ग्रामपंचायत येथे

आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पट्टेवाटप करून पंधरवाडा सांगता कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी व आर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व सर्व महसूल कर्मचारी वर्ग यांनी संघटीतपणे काम करून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान यशस्वीपणे पार पाडला, असे आष्टी तहसीलदारांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *