आजपासून दोन दिवस पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन

वर्धा (जिमाका): मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच लोक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलन दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी, लोक महाविद्यालय वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्या दिनांक २९ नोव्हेंबर शनिवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात होणार आहे.

याच दिवशी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. नीरज हातकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक, कवी, समीक्षक प्रा. डॉ. राजेंद्र मुंडे, स्वातंत्र्यलढ्यात लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटवाल, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाईकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक तथा साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सार्वजनिक बजाज वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ वाजतापासून विजयराज बोधनकर व सुनील वानखेडे यांचा चित्र बोलकामे होतात तेव्हा, शब्द चित्रतो आम्ही हे विशेष सत्र आरंभ होईल. यात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील रसिक सहभागी होतील. दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५.३० वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.

अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. तीर्थराज कापगाते राहतील. यावेळी मराठवाडा विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुस्से, कवी प्रशांत पनवेलकर, संजय इंगळे तिगावकर उपस्थित राहतील. याच्यासह नामवंत कवी सहभागी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *