बुद्धा टेकडीवर शौर्य नीलेश टेंभे स्मृती वृक्षारोपण

वर्धा:- सुकळी स्टेशन येथील रहिवासी नीलेश टेंभे यांचा ८ वी वर्गात शिकणारा शौर्य वय १४ हा रविवारी आंघोळीकरिता गेला असता नदीत अपघाती निधन झाले. निधनानंतर कोणतेही कर्मकांड, रुढी आणि अंधविश्वासाच्या परंपरेला फाटा देत शौर्यचा अंत्यसंस्कार पार पडला. अंत्यसंस्कारानंतर गावातच धाम नदी असताना वाहत्या पाण्यात अस्थी विसर्जित करून नदीचे पाणी दूषित करण्याऐवजी, दिनांक ३ ऑक्टोबरला बुद्धा टेकडीवर खड्ड्यात अस्थी टाकून त्यावर पर्यावरण पूरक बोधी वृक्ष लावण्यात आले.

याप्रसंगी श्रावक संघ बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, बुद्धा टेकडी मित्र परिवाराचे सक्रिय सदस्य सुनील ढले, ऋषिकेश फुसाटे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव ताकसांडे, बुद्धा टेकडी मित्रपरिवाराचे जेष्ठ सदस्य रमेशराव कांबळे, दिवंगत शौर्यचे वडील निलेश टेंभे, आई सोनाली, बहीण पूर्वल टेंभे व बुद्धा टेकडी मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी बुद्ध वंदना, धम्मपालन गाथा घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *