लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेसला हिंगणघाट येथे थांबा मंजूर

खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एक यश

वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील हिंगणघाट या महत्त्वाच्या शहरात तसेच व्यापारिक दृष्टीकोनातून सुद्धा या महत्त्वाच्या ठिकाणी लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह या गाडीला हिंगणघाट येथे थांबा मिळण्याबाबत हिंगणघाट येथील रेल्वे प्रवासी संघाकडून खासदार अमर काळे यांना हा विषय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करण्याबाबत वारंवार पाठपुरावा होत होता. खासदार अमर काळे यांच्याकडून रेल्वे मंत्र्यांकडे होत असलेला पत्रव्यवहार व लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या चर्चेत खासदार अमर काळे यांनी रेल्वे गाड्यांना थांबे मिळण्याबाबत अनेकदा मागणी केली. यामध्ये या गाडीचा सुद्धा समावेश होता. शेवटी लोकांची मागणी व खासदार अमर काळे यांचा पाठपुरावा याला रेल्वे मंत्री व रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देऊन हिंगणघाट येथे गाडी संख्या क्रमांक २०१०५ व २०१०६ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह या दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला हिंगणघाट येथे थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

खासदार अमर काळे प्रथमतः लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी रेल्वे विभागाच्या झालेल्या चर्चेत बोलताना लोकसभा मतदार संघातील महत्त्वाच्या ठिकाणी लोकांच्या सोयीच्या दृष्टीने बऱ्याच गाड्यांना स्टॉपेज देणे, पुलगाव-वरुड मार्ग ब्रॉडगेज करणे इतकेच नव्हे तर कोरोना पूर्वी ज्या रेल्वे गाड्यांना वर्धा लोकसभा मतदार संघात रेल्वे स्टेशनवर स्टॉपेज सुरु होते व कोरोनामुळे ते बंद करण्यात आले होते ते पूर्ववत सुरु करण्याबाबत त्यांनी आपल्या पहिल्या अधिवेशनापासूनच हा विषय सातत्याने लोकसभेत रेल्वे विभागाच्या झालेल्या चर्चेत प्रत्येक वेळी मोठ्या हिरीरीने मांडला ते केवळ लोकसभेत बोलूनच थांबले नाही तर जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी रेल्वे मंत्र्यांना भेटून आपल्या मतदार संघातील रेल्वे विभागाच्या स्टॉपेज, ब्रॉडगेज, नविन गाड्या सुरु करणे, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकरीता सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी बाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा खासदार अमर काळे यांचा होता. या माहितीमध्येच लोकमान्य टिळक ते बल्लारशाह गाडी नंबर २०१०५ व २०१०६ या गाडीला हिंगणघाट रेल्वे स्टेशनवर थांबा मिळण्याबाबतचा सुद्धा समावेश होता. याबाबत त्यांनी पाठपुराव्याचा भाग म्हणून पत्र क्र. १०१७ दि. २८.११.२०२५ ला लेखी पत्र सुद्धा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले होते.

खासदार अमर काळे यांचा लोकसभा मतदार संघातील रेल्वे विषयक समस्या सोडविण्याचा पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्न यांची रेल्वे मंत्रालयाने सुद्धा दखल घेतली. रेल्वे विभागासंबंधीच्या वर्धा लोकसभा मतदार संघातील बऱ्याचशा समस्यांबाबत रेल्वे मंत्रालयाने दखल घेणे सुरु केले असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह या गाडीला हिंगणघाट येथे थांबा मिळणे ही खासदार अमर काळे यांच्या प्रयत्नांचीच परिमिती आहे. खासदार अमर काळे यांनी हिंगणघाट येथील रेल्वे प्रवासी संघाकडून सतत मागणी रेटून धरणे व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार म्हणून अमर काळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद म्हणून २०१०५ व २०१०६ या गाडीला हिंगणघाट येथे थांबा दिल्याबद्दल खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे पुनःश्च आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *