सराफा व्यावसायिकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पोलिसांकडून कारवाईच्या नावावर सराफा व्यावसायिकांची गळचेपी करण्यात येत होती. त्यामुळे अनेक सराफा व्यावसायिक व पोलीस आमने सामने आले होते. पोलीस कारवाईच्या विरोधात अनेकदा सराफांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. तथापि, सराफाव्यवसायिक व पोलीस यांच्यात समन्वय असावा, यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकारघेत सराफा व्यावसायिक व पोलिस यांच्यात समन्वय स्थापन करण्यासाठी राज्यस्तर, पोलिस आयुक्तालय व जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सराफा व्यावसायिकांच्या समस्यांच्या आता दक्षता समिती स्थापना
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा – सराफा व्यावसायिकांना अडअडचणी व समस्यांची सोडवणूक तसेच अनेक प्रकरणात पोलिसांकडून होणाऱ्या कारवाई दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून राज्य व जिल्हा स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये पोलीस अधिकारी यांसह सराफा व्यावसायिकांचा समावेश राहणार आहे.