मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शेतकरी सुधीर धनराजराव वाटे यांचे वासरू तर प्रेमराज ध्रुटे यांच्या शेताजवळच्या गोठ्याच्या बाहेर बांधलेले असताना वाघाने सकाळच्या सुमारास अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात वासरू यांचा जागीच मृत्यू झाला, तर बैल हा गंभीर जखमी झाला.
सकाळी ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आली. वाघाच्या पायाचे ठसे परिसरात आढळले असून, हा हल्ला एका मोठ्या वाघाने केल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.