पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कार्यकाळात जिल्हयाचे पाऊल पडते पुढे

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्याच्या विकासाच्या पटावर मागील एक वर्ष ठळकपणे उठून दिसत आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, पंचायत, पायाभूत सुविधा, महिला-बालकल्याण आणि पर्यावरण अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत कामांची घनता, गती आणि व्याप्ती वाढलेली आहे. ही कामगिरी केवळ निधी मंजुरीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी, नवकल्पना आणि सेवासुलभतेवर भर देणारी आहे.

याच निकषांवर या एका वर्षाचा आढावा घेणे आवश्यक ठरते. वर्षपूर्ती निमित्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विदर्भातील अष्टविनायक म्हणून ख्याती असलेल्या केळझर येथील सिद्धीविनायकाची महाआरती करीत दर्शन घेत आपल्या दुसऱ्या वर्षाच्या पर्वाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी जनकल्याणासाठी सिद्धी विनायकाला साकडे घातले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *