वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू, एक जखमी

प्रतिनिधी / द. प्रतापगडाचे वारे हिंगणघाट : पावसादरम्यान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला. ही घटना धोत्रा परिसरात शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, वायगाव बावड (नेपाणी) असलेले अनिल दत्तजी ठाकरे (वय ४५), सौरभ गजानन ठाकरे (वय २५), मुलगा वेदांत अनिल ठाकरे (वय १८) हे तीन जण नातेवाईक मोटारसायकलने चारमंडळ येथे आवश्यक कामासाठी जात होते.

मोटारसायकलने धोत्रा मार्गे चारमंडळला जात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यावेळी त्यांनी मोटार सायकल थांबवली आणि झाडाखाली रेनकोट घालत होते. दरम्यान, अचानक विजेच्या कडकडाटासह होऊन वीज कोसळली, या दुर्दैवी घटनेमध्ये सौरभ अनिल दत्तजी ठाकरे, सौरभ गजानन ठाकरे हे दोघेही जागेवर ठार झाले. मुलगा वेदांत अनिल ठाकरे हा जखमी झाला. दोन्ही मृतकांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. वेदांत अनिल ठाकरे हा जखमी अवस्थेत भरती आहे. शुक्रवारी मुसळधार पावसासोबत मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होता. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *