प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना सिंदी शहराच्या उंबरठ्यावर गेल्या चार दशकांपासून बांगलादेशी रोहिंग्यांनी ठाण मांडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०१८ मध्ये नगर परिषदेचा ठराव होऊनही आणि प्रशासकीय नोटिसा बजावूनही या घुसखोरांवर ठोस कारवाई झालेली नाही. या विलंबामुळे ‘या घुसखोरांना नेमके कोणाचे अभय मिळत आहे ?’ असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.
नजीकच्या ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे सहा एकर शासकीय जमिनीवर या रोहिंग्यांनी बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून कारवाई होण्याऐवजी याठिकाणी पक्की बांधकामे उभी राहत आहेत. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला आहे.