निसर्गरम्य ऑक्सीजन पार्कचा विविधांगी विकास करणार–पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

ऑक्सिजन पार्क पर्यंटनस्थळ परिसराची पाहणी

परिसरातील स्वच्छता अभियानात सहभाग

 तालुका क्रिडा संकुलाची पाहणी

वर्धा, दि.25 (जिमाका) : आयटीआय टेकडीचा परिसर विस्तीर्ण असून विविध शासकीय कार्यालयांसह बोलके ऑक्सिजन पार्कची निर्मिती याठिकाणी करण्यात आली आहे. पार्कला ‘क’ वर्ग पर्यंटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निसर्गरम्य पार्क परिसराचा विविधांगी विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ.भोयर यांनी आज सकाळी ऑक्सिजन पार्कला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, मुख्याधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी समर्थ शिराळे, निसर्ग सेवा समितीचे संस्थापक मुरलीधर बेलखोडे, पंतजली योग पिठाचे दामोधर राऊत, आधारवड जेष्ठ नागरिक संघटनेचे प्रा. शेख हाशम, निलेश किटे आदी उपस्थित होते.

निसर्गरम्य असलेल्या ऑक्सिजन पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यांना सोईसुविधा निर्माण करुन देण्यासाठी येथे लवकरच विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय, ऊर्जा, क्रीडा सुविधा, मुक्तांगण तयार करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच नागरिकांना या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पुढे बोलतांना म्हणाले.

पालकमंत्र्यांची तालुका क्रीडा संकुलाला भेट

रुपये 5 कोटी खर्च करुन खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तालुका क्रिडा संकुलाचे लोकार्पण 28 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणे येथेही सुविधा उपलब्ध होणार आहे. खेळाडूंसाठी 200 मीटर धावनपथ, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, रिटर्निंगहॉल, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा निर्माण करुन देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी तालुका क्रीडा संकुलाला भेट दिल्यानंतर सांगितले.

स्वच्छता अभियानात पालकमंत्री सहभागी

जिल्ह्यात 17 सप्टेंबर तर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज आयटीआय टेकडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वत: सहभाग घेऊन परिसरातील स्वच्छता राबविण्यात राबविले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, गटविकास अधिकारी, निलेश किटे, जिल्हा परिषदे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, स्काऊट गाईड कार्यालयाचे अधिकारी, स्काऊट गाईड सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *