नागरिकांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून ते त्या जमिनीवर वास्तव्यास असूनही अद्याप त्यांना अधिकृत दस्तऐवज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शैक्षणिक, आर्थिक व नागरी सोयी-सुविधांबाबतही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खासदार श्री. अमरभाऊ काळे यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “संबंधित महसूल व नगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून या प्रकरणात योग्य तो पाठपुरावा केला जाईल. कोणताही पात्र नागरिक न्यायापासून वंचित राहणार नाही.”