घाडी त. आष्टी येथे डाकघर सुरु करण्यास मंजूरी

खासदार अमर काळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा धाडी (साहूर) त. आष्टी जि. वर्धा येथील गावकऱ्यांकडून डाकघर सुरु करण्याबाबत खासदार अमर काळे यांचेकडे सतत मागणी करणे सुरु होते. धाडी हे गाव आष्टी वरून जवळपास १० कि.मी. वर असून या गावामध्ये गावकऱ्यांना गावामध्ये आर्थिक व्यवहार करण्याकरिता गावामध्ये कोणतीही सोय उपलब्ध नव्हती.

आर्थिक व्यवहाराच्या छोट्या मोठ्या कामाकरिता त्यांना बँककिंवा पोस्ट ऑफिसच्या कामाकरीता आपली रोज मजुरी तसेच शेतीची कामे खोळंबून आष्टी किंवा साहूर येथे जावे लागते. ही अडचण गावकऱ्यांनी लक्षात घेऊन खासदार अमर काळे यांचेकडे धाडी येथे डाकघर सुरु करण्याबाबत निवेदन दिले. खासदार अमर काळे यांनी गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता व भौगोलिक परिस्थितीचा विचार करता धाडी गावात डाकघर अत्यावश्यक असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तातकाळ गावकऱ्यांच्या निवेदनावर पत्र देऊन तसेच डाकघर अधिक्षक, वर्धा यांना फोनवर संपर्क साधून धाडी येथे डाकघर सुरु करण्याबाबत प्रस्ताव तातकाळ मंजूर करण्याबाबतचे निर्देश दिले.

मुख्य अधिक्षक डाकघर वर्धा यांनी तातकाळ प्रस्ताव सादर केला व खासदार श्री. अमर श. काळे यांनी सुद्धा पोस्टमास्टर जनरल नागपूर यांचेकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी दि. १८.८.२०२५ ला धाडी येथे डाकघर सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. खासदार श्री. अमर काळे यांच्या पाठपुराव्यातून व गावकऱ्यांच्या मागणीनुसार धाडी त. आष्टी येथे लवकरच डाकघर सुरु होणार आहे. धाडी येथे डाकघर सुरु झाल्याने लोकांना आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा तसेच पोस्टातून मिळणाऱ्या इतर सुविधा ह्या गावातच मिळणार असल्याने गावकऱ्यांनी खासदार अमर काळे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *