वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांचा आज वाढदिवस असतानाही त्यांनी वैयक्तिक उत्सवापेक्षा जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत दिल्लीमध्ये आपले संसदीय कामकाज सुरू ठेवले आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत शिक्षक पात्रता परीक्षा (ऊऊँ) संदर्भात दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
खासदार अमर काळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांना दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र देऊन ३१ मार्च २०१५ पूर्वी शिक्षक सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना ऊऊँ उत्तीर्ण होण्याच्या अनिवार्यतेतून योग्य ती सूट देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१७ मध्ये निःशुल्क आणि अनिवार्य बाल शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २३(२) मध्ये केलेल्या दुरुस्तीमुळे ३१ मार्च २०१५ रोजी किंवा त्यापूर्वी शिक्षक सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही ऊऊँ उत्तीर्ण होण्याची अट लागू झाली आहे. मात्र, यापूर्वी निर्धारित नियमांनुसार नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांसमोर या बदलामुळे सेवाकाळ आणि भवितव्याबाबत अडचणी निर्माण झाल्याचे खासदार काळे यांनी पत्रात नमूद केले आहे. ‘३१ मार्च २०१५ पूर्वी नियुक्त व त्या वेळी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षкаंच्या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना ऊऊँच्या अनिवार्यतेतून योग्य ती सूट देण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा,’ अशी ठाम मागणी खासदार काळे यांनी केली आहे. तसेच संबंधित शिक्षकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य दिशा-निर्देश जारी करण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्याकडे केली आहे.