शिवसेनेचे उमेदवार रविकांत बाळपांडे यांच्या प्रचाराचे रॅलीचे

प्रतिनिधी / दै. प्रतापगङचे वारे:वर्धा : नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम चरणातील प्रचार सायंकाळी संपत असल्याने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बाळपांडे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना सचिव तथा शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड तसेच हास्य जत्रा फेम कलाकार गौरव मोरे हे सहभागी झाले आहे.

आज शहरातीलं कृष्णनगर स्थित संताजी सभागृहात शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन सभा संपन्न झाली. यात मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. सभेला शिवसेना प्रवक्ता आमदार मनिषाताई कायंदे, लोकसंपर्क प्रमुख राज दीक्षित, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र साप्टे, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, सह संपर्क प्रमुख श्रीकांत मिरापूरकर, महिला आघाडी प्रमुख शुभांगी ठोंबेकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेनंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.

शिवसेनेच्या नेत्यासोबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, हास्य जत्रा फेम कलाकार गौरव मोरे हे सहभागी झाले होते. या रॅलीतही सहभागी झालेला जनसमुदाय पाहून अनेक विरोधकांचे धाबे दणाणले आहे. उद्या मतदान होणार असून ३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *