वेतन नसल्याने आणि आयुष्याचा मोठा कालावधी चौकीदार म्हणून सेवा करताना घालविलेल्या व्यक्तीस सध्या बेतना अभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कारंजा (घाडगे) येथील तहसील कार्यालयात वीरेंद्र केशवराव देवगिरकर हा रोजंदारी चौकीदार पदावर १३ सप्टेंबर १९९६ पासून कार्यरत आहे. तत्कालीन तहसीलदार बावणे यांनी त्या पदावर त्याला रुजू करून घेतले होते. त्यावेळी वीरेंद्र यांचे मासिक वेतन ५७० रुपये होते. सध्या वीरेंद्र चौकीदार पदावर कार्यरत असून २९७ रुपये दररोजप्रमाणे मोबदला दिल्या जातो. सुट्टीच्या दिवसाचे शनिवार व रविवार या दिवसाचे वेतन मात्र देण्यात नाही.
तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशाने २२ नाव्हेंबर १९९९ रोजी त्यांना कामावरून काढून टाकले होते. नंतर त्याला कामगार न्यायालय नागपूर आणि औद्योगिक न्यायालय नागपूर यांच्या आदेशानुसार त्याला २००६ ला पुन्हा कोर्टाच्या आदेशान्वये कामावर घेतले. न्यायालयाच्या आदेशाने सन २००६ पासून तर आतापर्यंत रोजंदारीवरच तो काम करीत आहे. गेल्या २९ वर्षापासून बीरेंद्र हा रोजंदारीच्या माध्यमातून जीवन जगत आहे. वीरेंद्र केशवराव देवगिरकर यांना एक वर्षापासून त्याला अजून पर्यंत वेतन मिळाले करणे नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झालेले आहे.